Posts

बालकुमार साहित्य संमेलनावर अंजली व नंदिनीच्या गायनाची मोहिनी ....

२७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. शेवगाव (पद्मभूषण बाळासाहेब भारदे साहित्य नगरी) : भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित २७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. बालकुमार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दुपारी ३ वाजता ‘उगवते तारे’ या शीर्षकाखाली ही गायन मैफल झाली. ‘सूर निरागस हो’ या गीताने या मैफलीस प्रारंभ झाला. अंजली व नंदिनी या भगिनींनी मन मंदिरा तेजाने, क्षणभर उघड नयन देवा, घागर घेऊन निघाली, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, बापू सेहत के लिये हानिकारक है, यार हो यारा, मैं बेनाम हो गया, हसता हुवा नुरानी चेहरा असे एकाहून एक सरस लोकप्रिय हिंदी चित्रपट गीत, गवळण, भावगीत व भक्तीगीत सादर केले. झी मराठी वरील सारेगमप कार्यक्रमाचा उपविजेता उभरता गायक योगेश रणमले याने आनंद पोटात माज्या मायेना, ही दुनिया

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना - जैन ...

अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. कृषी विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, असे जैन इरिगेशन सिस्टिम्स्चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले़... अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. कृषी विकासाच्या दृष्टीने चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, असे जैन इरिगेशन सिस्टिम्स्चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले़ ते म्हणाले, कृषी उत्पादन तयार करणाºया व ज्यांचे उत्पन्न १०० कोटीपर्यंत असणाºया कंपन्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी करामध्ये १०० टक्के सवलत देण्यात आल्याने कृषीपूरक उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच २५० कोटी रूपयांपर्यंत उलाढाल असणाºया कंपन्यांना करात दिलासा देणारी बाब दिसून आली. अन्नप्रक्रिया उद्योग वर्षाला ८ टक्के वेगाने वाढत असल्याने यासाठी १४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा शेतकºयांना होईल. येत्या खरीप हंगामापासून शेतकºयांना उत्पादनाच्या हमीभावात दीडपट वाढ करण्यात येणार असून २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य अर्थसंकल्पात आहे. पुढे ते म्हणाले, नाबार्डच्या